⚡देवगड ता.१६-:
आषाढी एकादशी उत्सवानिमित्त देवगड तालुक्यातील ठिकठिकाणीच्या विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे ४ वाजता पाद्यपूजा,५ ते ६:३० काकड आरती,भाविकांना दर्शनास प्रारंभ,सकाळी ९ घटस्थापना व हरिनामाचा गजर,सायंकाळी ४ ते ५:३०
तारामुंबरी महिला भजन दिंडी, सायंकाळी ५:३० ते ६ नृत्यप्रिया
इंन्स्टीट्युशन परफेक्ट बीट डान्स ग्रुप जामसंडे, सायंकाळी ६ ते ७ कोयंडे बंधू प्रासादिक भजन मंडळ कालवी बुवा गुणाजी कोयंडे यांचे भजन, सायंकाळी ७ साजंआरती,७:१५ स्थानिक भजने आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच देवगड बाजारपेठ, आनंदवाडी,
सह तालुक्यातील अनेक विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे .
