जिल्हा नियोजन सदस्यांनी मांडलेले विषय मार्गी लावावे…

रवींद्र चव्हाण:ग्राम पंचायतीनी शासनाच्या योजनांचा फलक कार्यालयाबाहेर लावा…

⚡ओरोस ता.१६-: जिल्हा नियोजन सभेत सदस्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली आहे. अधिकाऱ्यांनी यांचे गांभीर्य ओळखून मांडलेले विषय मार्गी लावले पाहिजेत. त्याचा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा नियोजन समिती सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले.

जिल्हा नियोजन सभेच्या शेवटी पालकमंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना त्यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी एकाच दिवशी सर्व विषय न मांडता आपल्याला मिळालेल्या अधिकाराच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडून त्या सोडवून घ्याव्यात. आरोग्य, शिक्षण यासंह सर्व प्रश्न सुटले पाहिजेत, ही अपेक्षा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. ग्राम पंचायतीनी शासनाच्या योजनांचा फलक आपल्या कार्यालयाबाहेर लावावा. तसेच सात दिवसांनी कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. तसेच सदस्यांनी कामे देताना प्राधान्यक्रम लावून कामे द्यावीत. त्यामुळे कामांच्या यादीत बदल करावे लागणार नाहीत, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page