⚡कुडाळ ता.१५-: कुडाळ रेल्वे स्थानकाबाहेर बांधकाम सुरू असलेल्या शेडमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत खात्री करून तो मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी निपचित पडला असल्याचे निदर्शनाला आले. त्यावरून कुडाळच्या स्टेशन मास्तर प्रज्ञा नाईक यांनी कणकवली आरपीएफना याची माहिती दिली. आरपीएफ प्रवीण राजाराम मोरे यांनी कुडाळ पोलीस स्थानकात याची खबर दिली. कुडाळ पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर जात चौकशी केली. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृतदेहाच्या अंगावरच्या कपड्याच्या खिशात कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रिस्क्रिप्शन आढळली. त्यावरून त्याचे नाव प्रथमेश राजाराम दुखंडे (वय ३५, रा. कडावल) असल्याचे समजले. त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिल्यावर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी कुडाळ पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
कुडाळ रेल्वे स्थानकाबाहेर तरुणाचा मृतदेह…
