माणगाव येथील वाहून गेलेल्या भोई यांचा मृतदेह सापडला…

नऊ दिवसांनी पावशी शेलटेवाडी येथील भंगसाळ आला आढळून:निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची माहिती..

ओरोस ता.१५-:कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दत्ताराम लाडू भोई वय वर्षे ६० यांचा मृतदेह आज नवव्या दिवशी मिळाला आहे. दत्ताराम लाडू भोई हे ७ जुलै रोजी नदीमध्ये वाहून गेले होते त्यांचा मृतदेह आज 15.जुलै 2024 रोजी पावशी शेलटेवाडी येथील भंगसाळ नदीमध्ये सापडला आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page