आजगाव परिसरामध्ये मायनिंग प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री केसरकर कुटुंबियांच्या नावे तब्बल 100 हेक्टर जमीन…

विनायक राऊत: आपली जमीन नाही हे केसरकार यांनी सिद्ध करावे..

⚡सावंतवाडी ता.१४-: आजगाव परिसरामध्ये होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाच्या ठिकाणी प्रशिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कुटुंबियांच्या नावे तब्बल 100 हेक्टर जमीन असून केसरकर यांच्या भल्यासाठीच हा प्रकल्प येथे शासनाच्या माध्यमातून होत असून निसर्गरम्य सावंतवाडी तालुका मायनिंग वाल्यांच्या घशात घालण्याचा डाव शासनाचा असल्याचा आरोप माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला पत्रकार परिषदेत केला त्यांनी केसरकर यांच्या नावे असलेल्या जमिनीचे सातबारे यावेळी सादर केले.

तर आजगाव गावात मायनिंग होणाऱ्या परिसरात आपली जमीन नाही हे केसरकार यांनी सिद्ध करावे आम्ही लवकरच याबाबत त्या जमिनीचे खरेदी विक्रीची माहिती मिळवणार असून केसरकर यांचे पितळ उघडे करणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला.

You cannot copy content of this page