⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आज पुणे येथील श्री गणेश पॅकेजिंगचे मालक संतोष गायके व केंद्रप्रमुख शिवाजी गावीत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्रीमती शामल सुरेश परब यांनी शाळेसाठी ठेवलेल्या ठेवीतून हे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यात प्रोजेक्ट फाइल, प्रोजेक्ट पेपर, प्लास्टिक फोल्डर, प्लास्टिक पट्टी व पेन आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे. तर विलास नार्वेकर यांनी हस्ताक्षर सुधारण्यासाठी सुलेखन पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांला दिली. यावेळी संतोष गायके, योगेश होल, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, श्रावणी सावंत, केंद्रप्रमुख शिवाजी गावीत, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, सौ. जाधव, सौ. वारंग, सौ. शिरोडकर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विवेक नार्वेकर यांनी संतोष गायके यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी केतन नार्वेकर याने बोलताना आपल्या शाळेतील जुन्या गोड आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनुराधा सुर्वे यांनी तर आभार सीमा सावंत यांनी मानले.
