बांदा रोटरीचे कार्य हे उल्लेखनीय…

आनंद कुलकर्णी:रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा तिसरा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न..

⚡बांदा ता.१२-: बांदा रोटरीचे कार्य हे उल्लेखनीय भविष्यात अश्याच प्रकारे सामजिक सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य या समाजाभिमुख कार्यात यापुढे असेच काम करावे आणि रोटरी क्लबचा आलेख चढता ठेवावा असे प्रतिपादन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांनी येथे केले.

रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा तिसरा पदग्रहण सोहळा येथील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात पार पडला. यावेळी सिताराम गावडे यांनी अध्यक्ष, शिवानंद भिडे यांनी सचिव पदाची तर स्वप्निल धामापुरकर यांनी खजिनदार पदाची सूत्रे हाती घेतली.
यावेळी व्यासपीठावर आनंद कुलकर्णी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ , डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, असिस्टंट गव्हर्नर डॉ. विद्याधर तायशेटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व रोटरीच्या प्रार्थनेने सोहळा सुरू करण्यात आला. रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी शेती व्यवसायात प्रगती करणाऱ्या लांबर कुटुंबीय व हलाखीच्या परिस्थितीत उद्योग क्षेत्रात प्रगती करणाऱ्या श्रीकृष्ण शिरसाट यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मावळते अध्यक्ष प्रमोद कामत यांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सामाजिक, शैक्षणिक, आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आम्हाला अभिमान आणि समधान असल्याचे श्री कुलकर्णी म्हणाले.
नूतन अध्यक्ष सीताराम गावडे म्हणाले, रोटरीचा अध्यक्ष म्हणून निश्चितच भरीव असे कार्य करण्याचे आपला उद्देश आहे आणि त्यामध्ये मला अनेक मान्यवरांचा आशीर्वाद मिळेल तसेच तुमचा सर्वांच्या सहकार्याने आपण आपल्या क्लबची समाजसेवेची चालत आलेली यशस्वी परंपरा यापुढे चालू ठेवू.
यावेळी प्रमोद कामत यांचा आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आपण एक वर्षाच्या कालावधीत प्रकल्प राबवत असताना सर्व रोटरी सदस्य यांनी आपल्याला मोलाची साथ दिली, मी अध्यक्ष म्हणून नाही तर आम्ही रोटरी सदस्य हे सगळेच अध्यक्ष आहोत असे मिळून आम्ही काम केले. अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकांच्या अनेक अडचणी आमच्या समोर आल्या आणि रोटरीच्या माध्यमातून त्यांना मदत करायचे भाग्य लाभले तसेच संस्थापक अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केले असे सांगून मावळते अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी राजेश घाटवळ, प्रणय तेली, महादेव पाटकर, डॉ. विद्याधर तायशेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
     यावेळी भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक , ग्रामंचायत सदस्य श्रेया केसरकर, बँक ऑफ इंडिया बांदा शाखा व्यवस्थापक पवन कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष मंदार कल्याणकर, सुदन केसरकर, सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, दिलीप कोरगावकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, फिरोज खान, बाबा काणेकर, घनश्याम पावसकर, संतोष सावंत, डॉ. नारायण नाईक, विराज परब, दिगंबर गायतोंडे, स्वागत नाटेकर, सचिन मुळीक, तुषार धामापुरकर, रत्नाकर आगलावे, स्वप्नील धामापूरकर, प्रवीण शिरसाट, सुनील राऊळ, वसंत राऊळ, दिलीप घोगळे, प्रसाद सातार्डेकर, आनंद गवस, अनंत नाडकर्णी, डॉ. प्रसाद कोकाटे, योगेश परुळेकर, हनुमंत  शिरोडकर, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी रोटरी क्लब बांदा या परिवारात रवी गवस यांना नवीन सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वागत नाटेकर व संतोष सावंत यांनी केले.

You cannot copy content of this page