बाबा काणेकर; भाजप सटमटवाडी ग्रामस्थ्यांसोबतच राहणार….
⚡बांदा ता.१२-: मुंबई-गोवा महामार्गवर बांदा सटमटवाडी येथे प्रस्तावित असलेला बोगदा व सेवा रस्ता हा शासनाने नेमून दिलेल्या मुळ आराखड्याप्रमाणेच करून घेण्यात येईल व यासाठी बांदा शहर भाजपा ही पूर्णपणे सटमतवाडी ग्रामस्थ्यांसोबतच असल्याचे प्रतिपादन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
काल बांदा ग्रामपंचायत मध्ये सटमटवाडी ग्रामस्थांची विशेष सभा संपन्न झाली. या सभेत बोगद्याचा मुळ आराखडा बदलल्याचा आरोप ग्रामस्थानी करत ग्रामपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विशेष सभा ही वादळी ठरली होती.
या पार्श्वभूमीवर श्री काणेकर यांनी बांदा भाजपा ही पूर्णपणे सटमटवाडी ग्रामस्थ यांच्यासोबत असून बोगद्याचे व सेवा रस्त्याचे काम हे मुळ आराखड्यानुसारच करण्यासाठी आपल्यासोबत असल्याचे त्यांनी संगितले.
