⚡मालवण ता.१२-: मालवण येथील स. कां. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंख्या दिन विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना लोकसंख्या दिना बाबत माहिती देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण या ठिकाणी असणारी लोकसंख्या आणि त्यांच्यामध्ये असणारे बदल याविषयी सखोल आकडेवारी सहीत महिती दिली, तसेच अतिरिक्त असणारी लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या, आणि अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टीने कशा पद्धतीने बघता येईल यासंबंधी आढावा त्यांनी घेतला.
यावेळी प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. पवार, प्रा. मीनल सामंत, प्रा.एम. आर. खोत, प्रा. डी. व्ही. हारगीले, प्रा. प्रमोद खरात यांनी लोकसंख्येवर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधून दीपिका चव्हाण, लक्ष्मी पारकर यांनी लोकसंख्येवर पेपर प्रेझेन्टेशन करून त्याद्वारे गेल्या दोनशे वर्षातील लोकसंख्येत झालेले बदल व लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना याविषयी माहिती दिली.
यावेळी अमृता वायंगणकर व करूणा हत्तिकर या विद्यार्थिनीनी लोकसंख्येवर आधारित रांगोळी काढली. वर्ग सजावट प्रसाद बागवे, प्रणाली खडपे , सानिका व इतर विद्यार्थ्यांनी केली. या कार्यक्रमात अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी. व्ही. हरागीले, मराठी विभागाच्या डॉ. उज्वला सामंत, हिंदी विभागाचे डॉ. हंबीरराव चौगले या तिघांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा अर्थशास्त्र आणि व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्वा आचरेकर हिने केले, सूत्रसंचालन चैताली कुणकवळेकर हिने केले. आभार प्रदर्शन संतोष तांबे याने केले. कार्यक्रमाचे आयोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. हारगीले तासेच व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. आर. खोत, प्रा. प्रमुख खरात आणि अर्थशास्त्राचे विद्यार्थी चैताली कुणकवळेकर, पूर्वा आचरेकर, दीपिका चव्हाण, लक्ष्मी पारकर, संतोष तांबे, अमृता वायंगणकर, करुणा हत्तीकर, प्रसाद बागवे, प्रणाली खडपे, गावडे सानिका यांनी केले. कार्यक्रमाचे
