मोफत अर्ज भरून दिले जाणार:
माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या माध्यमातून सेवा..
⚡सावंतवाडी ता.१२-: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधाच आज थाटात शुभरांभ करण्यात आले आहे. शहरातील नगरपरिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पासून सुरू करण्यात आली आहे.दरम्यान माठेवाडा सालईवाडा, जुना बाजार, मच्छी मार्केट, उभा बाजार या भागातील महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन श्री. आडिवरेकर यांनी केले आहे.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे माझी उपनगराध्यक्ष राजू बेग, माजी नगरसेविका दिपाली भालेकर माजी नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, दिलीप भालेकर केतन आजगावकर अमित गवंढळकर,परीक्षेत मांजरेकर, नागेश जगताप, नंदू गावडे,कुशी पवार, राहिल सासोलकर गरव बांदेकर ,अनुराधा पवार, अमीशा सासोलकर,आदी उपस्थित होते
