शुल्क भरले ग्राम पंचायतीने
तहसील, ग्रामपंचायत कार्यालयाच्या उपक्रम..
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तहसील कार्यालय मार्फत करूळ येथे 28 विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. करुळ ग्रामपंचायत यांनी विनामूल्य विद्यार्थ्यांना हे दाखले उपलब्ध करून दिले आहेत. दाखल्यांची शासकीय फी ही ग्रामपंचायत यांच्या वतीने भरण्यात आली आहे.
तहसील कार्यालय वैभववाडी, ग्रामपंचायत करूळ व माध्यमिक विद्यालय करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना लागणारा वय अधिवास दाखला, उत्पन्न दाखला व डोंगरी दाखला देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, अव्वल कारकून सौ. कांचन मांजरेकर, श्री. पुजारे, सेतू सुविधा केंद्राचे प्रमुख शैलेश सुर्वे, महा-ई-सेवा केंद्राचे प्रमुख अजय कर्पे, श्री. विटेकर, ग्रामसेवक शशिकांत गुरव, तलाठी युवराज पाटील यांचे विशेष परिश्रम घेतल. सर्व विद्यार्थ्यांना तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी गावात दाखले उपलब्ध करून दिले. दाखले उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी तहसील कार्यालय व ग्रामपंचायत यांचे आभार मानले.
दाखले वितरण प्रसंगी नायब तहसीलदार दिग्वीजय पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, करुळ सोसायटी चेअरमन दिगंबर पाटील, मुख्याध्यापक दीपक घाटगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, माजी उपसरपंच महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य विलास गुरव, रेखा सरफरे, श्री कानडे सर, श्री. वैभव पाटील सर, श्री गोरे सर, सौ. मेस्त्री, श्री नागेश पांचाळ, दत्तराम पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोरे सर यांनी तर आभार वैभव पाटील यांनी मानले.
