त्या स्टॉल धारक महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा…

ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मंगेश लोक यांची मागणी..

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडीतील स्टॉल धारक महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला नगरपंचायतीमधील सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी वैभवाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्याकडे निवेदनातून केली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख शिवाजी राणे नगरसेवक मनोज सावंत उपजिल्हाप्रमुख स्वप्निल रावराणे उपविभाग प्रमुख यशवंत गव्हाणकर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की वैभववाडी शहरातील सत्ताधाऱ्यांनी स्टॉल हटवले मात्र त्यांना पर्यायी जागा दिली नाही कित्येक महिने आपल्याला पर्यायी जागा दिली जाईल आणि स्टॉल लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू या आशेवर उद्ध्वस्त स्टॉल धारक आहेत. त्यामुळेच त्या महिलेने स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे आत्महत्या करण्यास शोध करणे हा कायदेशीर गुन्हा असून सत्ताधाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी तालुक्याच्या वतीने करण्यात आली.

You cannot copy content of this page