कोरोनाने घेतले आणखी दोन बळी; १७ जणांची मात
सिंधुदुर्गनगरी ( दि.- 03 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 543 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 583 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 67 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आणखी दोन रुग्णांचे निधन झाले आहे. १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
