हेमंत मराठे व राणेवाडी ग्रामस्थ यांच्या मागणीला यश: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह संदीप गावडे यांचे मानले आभार..
सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात असलेल्या राणेवाडी मध्ये जाण्यासाठी नदीपात्रात कमी उंचीचा कॉजवे असल्याने पावसाळ्यात पूरस्थितीमध्ये पाच पाच सहा सहा दिवस राणेवाडी कॉजवेवर पुराचे पाणी असते.यामुळे या वाडीचा गावापासूनचा संपर्क तुटतो.या नदीपात्रात जास्त उंचीचा पूल बांधावा अशी या वाडीतील निवृत्त शिक्षक वसंत राणे व ग्रामस्थ यांची ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडे मागणी होती.या मागणीला अनुसरून उपसरपंच हेमंत मराठे यांनी बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण,सार्वजनिक बांधकाम विभाग कडे याठिकाणी पूल व्हावा अशी मागणी केली होती.ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी मराठे यांनी पाठपुरावा करत असताना सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप गावडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम च्या बजेटमध्ये राणेवाडी येथील वस्तीत जाण्यासाठी नदीपात्रात पूल बांधण्याचे काम मंजूर झाले असून यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.ह्या पुलाच्या मंजुरी बद्दल सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी खासदार नारायण राणे,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी आमदार राजन तेली व माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या सहकार्यांने हे काम मंजूर झाले असल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
