पालकमंत्री रविंद्र चव्हाण, निलेश राणे यांच्या माध्यमातून कविलकाटे शाळेत मोफत वह्या वाटप…

⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे नेते कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कविलकाटे १नंबर वॉर्ड मधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कविलकाटे शाळेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कविलकाटे येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.समील जळवी यांनी मुलांना गुणवंत गुणवंत व्हा..किर्तीवंत व्हा..आणि आपल्या शाळेचे नाव उज्वल करा असे सांगुन सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.मुलाना वह्यांचे वाटप करते वेळी श्री. समील जळवी,श्री.सुनील जळवी ,श्री.निलेश पावसकर ,श्री.सावळाराम जळवी ,राजू जळवी,बाबू हरमलकर ,दिवाकर जळवी,दयानंद मसुरकर अन्य उपस्थित होते.तसेच मुख्याध्यापक श्रीम.माधुरी दत्ताराम राणे ,उपशिक्षिका श्रीम.ज्योत्स्ना संजय चिंदरकर ,उपशिक्षिका श्रीम.समृद्धी शंकर नांदोसकर ,शाळेतील शिक्षक आणि विध्यार्थी यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.यावेळी अन्य शिक्षक कर्मचारी वृन्द शालेय विद्यार्थी व कविलकाटे ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page