⚡बांदा ता.१०-: पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी शहरामध्ये संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक ११ ते सोमवार दिनांक १५ जुलै या कालावधीत सकाळी ५. ३० ते ७. ३० या वेळेत करण्यात आले आहे.
सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग घेण्यात येणार आहेत. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वैश्य भवन, गवळीतिठा-सावंतवाडी येथे सदर शिबिर होणार आहे.
तरी सर्व योगाभ्यासप्रेमी पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या योगशिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर (मो. 9823881712), तुळशीराम रावराणे (मो. 7083602504), महेश भाट (मो. 9975543446), दत्तात्रय निखार्गे (मो. 9420306869) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहरामध्ये ११ ते १५ रोजी योगोपचार शिबिराचे आयोजन…
