विविध मागण्यांसाठी शिक्षक समिती आक्रमक…

शिक्षण विभागाच्या विरोधात केले आंदोलन: शिक्षण मंत्र्यांना आपला विभागच कळला नसल्यानेच जिल्ह्यातील शिक्षक डीएड बेरोजगार यांच्यावर अन्याय झाला;राजन तेली..

सिंधुदुर्गनगरी ता ८-:१५ मार्च २०२४ चा अन्यायकारक संच मान्यता आदेश तात्काळ रद्द करावा. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यांसाठी २१ मे रोजी राबविलेल्या समुपदेशन प्रक्रियेत बदल्या झालेल्या शिक्षकांना तात्काळ बदली आदेश द्या. पदवीधर ,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे प्रमोशन करा. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करा. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शासन आदेशाची पायामल्ली होत आहे.शिक्षकांच्या मागण्यांचा विचार होत नाही. चुकीच्या पद्धतीने कार्यवाही होत आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी आज प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन केले.तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याची भेट घेऊन चर्चा केली.व निवेदन सादर केले.
     
       सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ मे२०२४ रोजी ओरोस ,सिंधुदुर्गनगरी येथे दि.२१ जून २०२३ च्या शिक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांना विकल्प देण्यासाठी समुपदेशन राबविणेत आले. सदरच्या समुपदेशनात  शिक्षकांना विकल्पात नवीन शाळेची निवड करण्याची संधी मिळाली. परंतु आजही आचारसंहितासंपल्यावरही त्यांचे पदस्थापना आदेश देणेची प्रशासनाची तयारी नाही. त्यामुळेच आज हे ठिय्या आंदोलन करण्यात आले, तर या
आंदोलनातून विविध मागण्याकड़े लक्ष वेधण्यात आले. तसेच
दि.२१मे रोजी प्राथमिक शिक्षकांना विकल्प देण्यासाठी समुपदेशन राबविणेत आले त्या शिक्षकांना त्वरीत पदस्थापना आदेश द्यावेत.
पदवीधर, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांना कार्यमुक्त करावे.
समानीकरणाच्या नावाखाली तालुके ब्लाॅक न करता इच्छुक शिक्षकांना बदलीसाठी पाचवा टप्पा राबविण्यात यावा.
संवर्गनिहाय झालेल्या बदल्यांमध्ये शिक्षकांचे चार टप्पे राबविले. त्यामध्ये समानीकरण करताना मोठ्या पटाच्या शाळा ब्लाॅक करण्यात आल्या. मुळात समानीकरणाचे धोरण हे शाळेवर लावले जाते. तेही कमी पटाच्या शाळांपासून सुरूवात होऊन जादा पटाच्या शाळेपर्यत येते. परंतु तालुकेच ब्लाॅक केल्याने शिक्षकांना आपल्या तालुक्यात येता आले नाही. अजूनही बदली इच्छुक शिक्षक आहेत. आपण विकल्पानुसार बदली मिळालेल्या शिक्षकांना त्वरीत बदली पदस्थापना आदेश दयावेत. तसेच पाचवा टप्पा हा इच्छुक शिक्षकांसाठी राबवावा. त्यात जिल्हयातील पदनिहाय एकूण रिक्त संख्या व होणारी नवीन भरती यानुसार समानीकरण लावल्यास ते शाळांवर लावावे. तालुके ब्लाॅक करू नयेत.
 शिक्षकांसाठी पाचवा टप्पा राबवताना इच्छुक सर्वच शिक्षकांना संधी दयावी. तसेच ती संधी देताना प्रमोशन व आंतरजिल्हा बदलीच्या जागा त्यांना रिक्त दाखविण्यात याव्यात. आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
       याबाबत चार दिवसात कार्यवाही न झाल्यास १३ जुलै पासून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

या आंदोलनात प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सरचिटणीस तुषार आरोस्कर यांच्यासह राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक समिती पदाधिकारी सुरेखा कदम, निकिता ठाकूर, नारायण नाईक, नामदेव जांबवडेकर ,प्रशांत परब, नीलम बांदेकर, संतोष वारंग, ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत आणावकर यांच्यासह मोठ्या संखेने जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले होते.

*शिक्षण मंत्र्यांना विभागच समजला नाही

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने आज सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी मार्गदर्शन करताना आपल्या शिक्षण मंत्र्यांना आपला विभागच कळला नाही त्यामुळे गोंधळ उडाला आहे त्यामुळेच जिल्ह्यातील शिक्षक, डीएड बेरोजगार यांच्यावर अन्याय झाला आहे असा आरोप राजन तेली यांनी केला .

You cannot copy content of this page