⚡कुडाळ ता.०८-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये ठीकठिकाणी पुरस्थिती उद्भवून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे लोकांची जेवण व राहण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. पावशी शेलटेवाडी येथील ग्रामस्थांची तत्काळ जेवणाची सोय करण्यास सांगितले. आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जेवणाचे वाटप पावशी माजी सरपंच बाळा कोरगावकर, आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण, पिंगुळी येथील शिवसैनिक संजय ठाकूर, रोहित शेलटे, शंभा शेलटे व ग्रामस्थ यांनी केले.
यावेळी येथील नागरिकांनी आमदार वैभव नाईक तसेच शिवसेना कार्यकर्त्यांचे आभार मानले.
अतिवृष्टीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मदतकार्य…
