सावंतवाडी ता.०८-: शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या महिला आघाडी प्रमुख तसेच कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यी प्रिय शिक्षिका सौ. सुष्मिता चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या दूरस्थ शिक्षणक्रमाअंतर्गत बॅरिस्टर नाथ पै बी.एड. कॉलेज कुडाळ या अभ्यास केंद्रात चालवल्या जाणाऱ्या शालेय व्यवस्थापन पदविका (DSM) परीक्षेत विशेष योग्यतेसह प्रथम श्रेणीचे 79.13 % गुण मिळवून अभ्यास केंद्रात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. भाषेवरील प्रभुत्व आणि परखड विचारांनी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशासाठी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर , कार्याध्यक्ष श्री. प्रशांत आडेलकर सचिव श्री. समीर परब राज्य कार्यकारिणी सदस्य सी.डी. चव्हाण,सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
शिक्षिका सुष्मिता चव्हाण शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण…
