राजन तेली; मी सरकार मध्ये असलो तरी माझा मायनिंगला विरोध,मी जनते सोबतच राहणार..
सावंतवाडी ता.०८-: मुलांना जर्मनीत नोकऱ्या देणार याचे आम्ही स्वागतच करतो, परंतु जिल्ह्यात रोजगार देणार होता त्याचे काय झाले ते आधी जनतेला सांगा उगाच निवडणुका आल्या की केसरकर नोकऱ्याचे गाजर दाखवतात. त्यामुळे आता केसरकरांनी कितीही लोकांना फसवलं तरी जनता आता फसणार नाही असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे लगावला.दरम्यान मतदारसंघात आमदार कोणाला करायचा हे आता जनताच ठरवणार,परंतु या मतदारसंघाच नुकसान होऊ नये यासाठी आता जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन ही श्री तेली यांनी केले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
ते पुढे म्हणाले मला केसरसोबत संघर्ष करायची गरज नाही जी वस्तुस्थिती आहे ती मी जनतेसमोर मांडली मला कोणत्याही प्रकारे मुलांचे नुकसान करायचं नाही त्यामुळे मी या ठिकाणी बोललो.त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना काय सांगायचे ते मी सांगितलेला आहे असे हे श्री तेली यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान मी जरी सरकारमध्ये असलो तरी आजगाव मधील लोकांची जी मायनिंग बाबतची भूमिका असणार तीच माझी असणार असंही श्री तेली यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
