⚡वेंगुर्ला ता.०७-: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण‘ योजना समाजातील शेवटच्या महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून मोफत फॉर्म वितरीत करण्यात येत आहे. ही योजना वेंगुर्ला तालुक्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी गावागावात भाजपातर्फे कॅम्प घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सांगीतले.
भाजपा वेंगुर्ला तालुका कार्यालयात ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण‘ योजनेचे मोफत फॉर्म वाटप करण्यात आले. यावेळी सुहास गवंडळकर, राजन गिरप, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, स्मिता दामले, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, निलेश गवस, अजित कनयाळकर, शरद मेस्त्री, समीर कुडाळकर, सुधीर गावडे, बाळकृष्ण येरम, प्रथमेश यंदे, छोटु कुबल उपस्थित होते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना मोफत गॅसचे वाटप, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, ‘माझी कन्या भाग्यश्री‘ अंतर्गत वयाच्या १८व्या वर्षानंतर मुलीच्या नावे १ लाख रूपये मिळणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
फोटोओळी – भाजपातर्फे महिलांना ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण‘ योजनेचे मोफत फॉर्म वितरण करण्यात आले.
