⚡मालवण ता.०६-: गुडमॉर्निंग क्रिकेट क्लब, मालवण यांच्यावतीने दि. ११ ते १४ जुलै या कालावधीत मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय ‘एक गाव- एक संघ’ पावसाळी रबरी (पांढरा) चेंडू क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५,५५५ रु. व चषक, द्वितीय पारितोषिक १०,१११ रु. व प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ १,५५१ व स्मृतिचिन्ह, मालिकावीर १,५५५ व स्मृतिचिन्ह, सर्वोत्कृष्ट फलंदाज १,००१ व स्मृतिचिन्ह, सर्वोत्कृष्ट गोलंदाज १,००१ व स्मृतिचिन्ह, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक १,००१ व स्मृतिचिन्ह, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक १,००१ व स्मृतिचिन्ह, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी १,००१ रुपये व स्मृतिचिन्ह असे बक्षिसांचे स्वरुप आहे. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी रिझवान शेख ९४२११४५७८६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
