त्रिंबक येथे १५ रोजी वृक्षारोपण महोत्सव…

⚡मालवण ता.०६-: त्रिंबक ग्रामपंचायत आणि जागृत त्रिंबक ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता त्रिंबक ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे तसेच मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे, तालुका कृषी अधिकारी, एकनाथ गुरव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page