कृषी दिनानिमित्त अंगणवाडीतील छोट्या मुलांना पत्रकार आबा खवणेकरांच्या हस्ते गणवेशचे वाटप…

⚡वेंगुर्ले ता.०६-: गुरुवारी जिल्हा परिषद शाळा केळुस कालवीबंदर येथे कृषी दिनानिमित्त अंगणवाडीतील छोट्या १० मुला – मुलींना केळुस गावचे माजी उपसरपंच व कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक व पत्रकार आबा खवणेकर यांच्या हस्ते गणवेश व बुटचे वाटप करण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका सौ.किरण रेवणकर,पुर्ण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक सौ.सारिका उरणे, पदवीधर शिक्षक मनिष खोंडे,केळुस ग्रामपंचायत सदस्य महेश नागवेकर,सौ.मानसी कुडव, कु.अक्षता केळुसकर,लक्ष्मण वराडकर,केळुस ग्रामपंचायत माजी उपसरपंच पांडुरंग शिवलकर,कृष्णा रेवणकर, अंगणवाडी मदतनीस सौ. नमता केळुसकर,महिला पालक वर्ग सौ. आरोही केळुसकर,सौ.वेंगुर्लेकर सौ.कोचरेकर,सौ. सुलक्षणा वराडकर, सौ. सुचिता केळुसकर, सौ ग्रणिता गोकरणकर, सौ.कुबल.सौ. गायत्री गावडे,सौ मानसी नागवेकर, सौ.संगिता वराडकर,सौ. सुहासिनी वराडकर, सौ.जयश्री राऊळ,सौ.श्रद्धा केळुसकर,सौ.सायली केळुसकर, सौ.गीतांजली वेगुलैकर.सौ सुप्रिया वेंगुर्लेकर आणि इतर महीला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page