शिष्यवृत्ती परिक्षेत सिद्धी गावडेचे यश…

⚡वेंगुर्ला ता.०४-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु.सिद्धी भरत गावडे ही पूर्व माध्यमिक परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा डिसोझा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

फोटो – सिद्धी गावडे

You cannot copy content of this page