⚡वेंगुर्ला ता.०४-: ब्रिलियंट एज्युकेशन सोसायटी मार्फत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेतल्या गेलेल्या ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा अनिष अखिल आरोस्कर हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये दुसरा आला असून याबद्दल त्याला रौप्य पदक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोझा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
फोटो – अनिष आरोस्कर
