देवगड रोटरी क्लबच्या वतीने होणार संजय धुरी यांच्या कथा काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

देवगड (प्रतिनिधी)

देवगड रोटरी क्लबचे माजी सेक्रेटरी संजय धुरी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे होणार आहे.


देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड या संस्थेचे सेक्रेटरी संजय भालचंद्र धुरी यांचे अचानक निधन झाले. त्यांनी लिखित केलेल्या कथा व काव्यसंग्रहाचे प्रकाशन व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली .मात्र रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी उद्योजक संग्राम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कथा व काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे उद्योजक संग्राम पाटील कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काव्यसंग्रहाचे प्रकाशन वाडा येथील प्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या वतीने देण्यात आली.

You cannot copy content of this page