ग्रामस्थांची अभियंतांकडे मागणी; हॉटेल व्यवसायिकांना देखील बसतोय मोठा फटका..
⚡आंबोली ता.०४-: आंबोली भागात वारंवार वीज खंडित होत असून भौगोलिक दृष्ट्या विचार करता आंबोलीत दिवस रात्र काळोख असतो, त्यामध्ये घरामध्ये वावरताना सुद्धा वृद्ध व रुग्ण लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे तात्काळ आंबोली विभागातील विजेच्या समस्या सोडवा अशी मागणी आज आंबोली ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील उप अभियंता यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
दरम्यान आंबोली ची आर्थिक घडी ही वर्षा पर्यटनावरच अवलंबून आहे व विजेच्या अशा अनियमितेमुळे त्याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना देखील बसत आहे त्यामुळे तात्काळ या समस्या मार्गी लावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
