अवैध दारू वाहतूक प्रकरणी उस्मानाबाद येथील दोघे ताब्यात…

आज सकाळची कारवाई: अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त..

⚡बांदा ता.०४-: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना उस्मानाबाद येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 18 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान या प्रकरणी आकाश शेरकर (वय 20) व आकाश सुकाळे (वय 22) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली.

You cannot copy content of this page