शिवसेना एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक यांचा इशारा..
⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ एसटी डेपोमध्ये दिवसा ढवळ्या अनागोंदी कारभार सुरू आहे. या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले असुन येत्या १०जुलै रोजी पर्यंत कारभार सुधरा नाही, तर आम्ही त्यात आमच्या स्टाईलने सुधारणा करु. असा इशारा शिवसेना एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक आणि शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिला.
शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱयांनी आज कुडाळ डेपो मॅनेजर संदीप पाटील यांची भेट घेऊन कुडाळ डेपोच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला आणि जाब विचारला. कुडाळ एसटी डेपोमध्ये कारभार सुधारा यासाठी आमदार वैभव नाईक यांनी ।अनेक वेळा प्रयत्न केले. तसेच कुडाळ एसटी डेपोमध्ये प्रवांशांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले असताना यात काहीच सुधारणा नसुन कुडाळ नविन स्टॅण्ड वरुन जशा पहील्या बसेस सुटत होत्या तसेच सोडण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनूप नाईक, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट शिवसेनेचे अतुल बंगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे , कुडाळ तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ तालुका शिवसेना युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, अष्पाक कुडाळकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुशील चिंदरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ शिवसेना शहर उपशहरप्रमुख गुरु गडकर, कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, शैलैश काळप, संदीप महाडेश्वर, अमित राणे व नविन बसस्टँडला असणारे रीक्षाचालक उपस्थित होते.
