माजगाव ग्रामपंचायतीवर ग्रामविकास अधिकारी नियुक्ती करा…

सरपंच अर्चना सावंत: पंचायत समिती आमरण समोर उपोषण सुरू..

⚡सावंतवाडी ता.०२-: माजगाव सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे पद गेल्या एक वर्षापासुन रिक्त आहे. याचा ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह गावाच्या विकास कामावरही परिणाम झाला आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून तसेच ओरोस येथे उपोषणही छेडूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवार पासून माजगाव सरपंच डॉ अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वजरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषण छेडले आहे.

You cannot copy content of this page