पालकांची तीव्र नाराजी; शाळा दुरुस्तीकडे दुर्लक्ष का.?; अजित सांगेलकरांचा सवाल..
⚡सावंतवाडी ता.०१-: शहरातील जिल्हा परिषदेच्या एक नंबर शाळेच्या भिंतीला मोठी भेग पडली असून भिंतीचा अर्धा भाग कोसळला आहे त्यामुळे सदरची शाळा धोकादायक बनली असून खुद्द शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शहरातीलच हे परिस्थिती असून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धोकादायक असलेल्या शाळेत मुलांना बसवायचे कसे असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून मुलांच्या जीवित असे शासन खेळत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.

दरम्यान शाळेबाबत शिक्षकांकडून देण्यात आलेला प्रस्ताबाबत शिक्षण मंत्र्यांकडून का दखल घेण्यात आली नाही असा सवाल श्री अजित सांगेलकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

