केसरकरांच्या नाकर्तेपणामुळे अर्बन बँक “लयास”गेली…

जयेंद्र परुळेकर यांचा आरोप: मल्टीस्पेशालिटीचे “गाजर नको”; उपजिल्हा रुग्णालयाचाच ‘दर्जा’ सुधारा..

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडीच्या आर्थिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेली अर्बन बँकेत राजकारण आणून मंत्री केसरकर यांनी ही बँक लयास नेली असा आरोप ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉ
जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली.दरम्यान केसरकर यांच्यामध्ये जर हिम्मत असती तर त्यांनी ही बँक वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते, परंतु ते स्पेशल अपयशी ठरले असा आरोपी श्री परुळेकर यांनी यावेळी केला. ते आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले अर्बन बँकेचे नाव हे खूप मोठं शहरात होतो परंतु ज्यांनी बँकेचे नियम डालुन मोठ-मोठी कर्ज दिली त्यांची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजेत अशी मागणी श्री परुळकर यांनी यावेळी केली. दरम्यान बँकेच्या हिताच्या दृष्टीने मंत्रीपदाचा वापर करून जर मंत्री केसरकराने ही बँक पुनर्जीवित केली असती तर बँकेचे कर्मचारी व बँक बँकेच्या ग्राहकांनी नक्कीच त्यांचे आभार मानले असते असेही परूळेकर यांनी यावेळी केसरकर यांना टोला लगावला. एकूणच मंत्री केसरकर हे राजकारणाप्रमाणे सपशील अपयशी ठरल्याचे चित्र या बँकेच्या विलीनीकरणच्या विषयावरून दिसून येते असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले सावंतवाडीच्या जनतेला मल्टी स्पेशालिटी चे गाजर दाखवण्यापेक्षा सावंतवाडी स्थित उपजिल्हा रुग्णालयातील दर्जा सुधारून गोरगरीब रुग्णांना दिलासा दिला तरी त्यांचे मंत्रीपद सार्थकी लागले असे म्हणता येईल. अन्यथा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत ही जनता दीपक केसरकर यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी यावे लागवला.

You cannot copy content of this page