खर्डेकर महाविद्यालयाला निरंजन डावखरे यांनी दिली झेरॉक्स मशीन…

वेंगुर्ला प्रतिनिधी- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी वेंगुर्ला येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाला झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिली आहे. सर्वच परीक्षांचे पेपर ऑनलाईन येत असल्यामुळे त्या पेपरची प्रिट काढून विद्यार्थ्यांना देणे, यासाठी महाविद्यालयाला अद्ययावत झेरॉक्स मशीनची आवश्यकता होती. ही अडचण लक्षात घेऊन आमदार निरंजन डावखरे यांनी झेरॉक्स मशीन दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

  या झेरॉक्स मशीनचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसन्ना देसाई, सुरेंद्र चव्हाण, प्रा.वामन गावडे, प्रा.सुनिल भिसे, प्रा.नवात्रे, प्रा.के.आर.कांबळे, प्रा.जे.वाय.नाईक, संभाजी पाटील, मिनल मांजरेकर, खोत, रश्मी गावडे, सुनिल आळवे, मोहन मोबारकर उपस्थित होते.

फोटोओळी – झेरॉक्स मशीनचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांच्या हस्ते झाले.

You cannot copy content of this page