ओटीपी मागून केली फसवणूक
*💫सावंतवाडी दि.०१-:* बँक मधून बोलत असल्याचे भासवत ओटिपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला आहे. मोईन मुबारक नाईक ( रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या युवकाने पोलिस स्टेशनला येत याबाबतची माहिती पोलिसांना दिली असून, अज्ञात युवकाविरोधात सायबर क्राईम अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
