सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपालाच मिळावी…

राजन तेली यांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे मागणी:दिपक केसरकर यांच्या सोबत एकही शिवसैनिक आलेला नाही..

⚡सावंतवाडी ता.२९-: मंत्री दीपक केसरकर आगामी विधानसभा निवडणूक हे भारतीय जनता पार्टीच्या भरवशावर लढू पाहत आहेत.मात्र स्थानिक सर्व निवडणुका या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या त्यामुळे येथे भाजपाची ताकद जास्त आहे त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी राजन तेली यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत एकही शिवसैनिक आलेले नाही हे लोकसभा निवडणुकीत दिसून मतांवरून दिसून आलेले आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आता विधानसभेची जागा ही भाजपलाच मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page