⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथील तीन घरांवर वडी हे महाकाय जंगली झाड कोसळून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडल्यावर याची तात्काळ दखल भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी घेऊन या तिन्ही कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत दिली आहे. भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी हि मदत सदर नुकसानग्रस्तांकडे सुपूर्द केली.
मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी दुपारी वडी हे झाड कोसळून तीन घरांचे मोठे नुकसान झाले. भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मसुरे कावावाडी येथे नुकसान ग्रस्त किरण पाटील, पांडू पाटील, समीर वस्त, सुचिता पाटील यांची भेट घेऊन त्यांना भाजप नेते निलेश राणे यांनी पाठवून दिलेली आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी चिंदरकर यांनी नुकसानग्रस्ताना धीर देत भाजप पक्ष व भाजप नेते निलेश राणे तुमच्या पाठीशी आहेत असा विश्वास दिला. तातडीच्या मदती बद्दल किरण पाटील तसेच इतर आपत्तीग्रस्तांनी आभार मानले.
यावेळी संतोष गावकर, देवेंद्र हडकर, शिवाजी परब, छोटू ठाकूर, सचिन पाटकर, यशवंत हिंदळेकर, पंढरीनाथ मसुरकर आदी उपस्थित होते.
