कणकवलीत वाऱ्यासह मुसळधार पाऊस…

⚡कणकवली ता.२९-: कालपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पाऊस हा किरकोळ प्रमाणात कोसळत होता. मात्र आज सकाळपासूनच कणकवलीत मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे शेतकरी वर्गाने शेतीच्या कामांना सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळते. मात्र हा पाऊस असाच धो – धो कोसळत राहिला तर शेतीचे देखील नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील आता चिंतेत पडल्याचे चित्र आहे. तर पुढील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page