साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर…

⚡मालवण ता.२८-: साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे यांच्यातर्फे मालवण तालुक्यात प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर, आणि तालुकास्तर भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेची अंतिम कथाकथन स्पर्धा दि. २० नोव्हेंबर रोजी प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी, आचरे येथे होणार असून या स्पर्धेचे विषय जाहीर करण्यात आले.

मालवण तालुका कथामालेची सभा नुकतीच उपाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर करण्यात आले. या सभेला रामचंद्र कुबल, परशुराम गुरव, सायली परब, संजय परब, कामिनी ढेकणे, अमृता मांजरेकर, भवन मांजरेकर, मनाली फाटक आणि मार्गदर्शक म्हणून सुरेश ठाकूर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी गट अ – इयत्ता ३री -४थी – विषय – जीवन कथा ( साने गुरुजींचे जीवन प्रसंग), गट ब – इयत्ता ५वी,६वी विषय – चरित्र प्रसंग कथा (निश्चित केलेल्या दहा पैकी एका समाजसुधारकांच्या जीवनकार्यातील प्रसंग कथा), गट क – इयत्ता ७वी,८वी – विषय – संस्कार कथा (अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा). अधिक माहितीसाठी रामचंद्र कुबल (9420210811) तसेच सुगंधा गुरव (9420078519) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मालवण तालुका कथामालेच्या कार्यवाह सुगंधा गुरव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page