ज्येष्ठ नागरिक संघाकडून सिद्धी भिडेचा सन्मान…

बांदा/प्रतिनिधी
कर्क रोगासारख्या दुर्धर आजारावर जिद्दीने मात करत नीटच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणार्‍या सिद्धी भिडे हिचे कौतुक ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदाचे पदाधिकारी व सदस्य यांनी शिवानंद भिडे यांच्या निवासस्थानी जाऊन केले.
शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांच्या हस्ते सिद्धी भिडे व तिचे आईवडील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे खजिनदार जगन्नाथ सातोसकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, परिवाराचे सदस्य महादेव वसकर, अंकुश माजगावकर, अच्युत पिळणकर व तुळशीदास धामापूरकर उपस्थित होते.
सिद्धीचे यश हे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून तिने यापुढेही असेच यश मिळवावे अशा सदिच्छा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page