नेमळ्यात घरावर झाड कोसळले…

सुदैवाने जीवितहानी टळली:घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..

⚡सावंतवाडी ता.२६-: तालुक्यात गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यात झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहे. याच वादळी वाऱ्यामुळे नेमळे गांवकर कुंभारवाडी येथील शेतकरी पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे घरालगतचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.

तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून हलक्या वाऱ्यासह पासून सुरु आहे. यात काही भागात झाडे कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. मंगळवारी माजगाव व सावंतवाडी शहरात झाडे कोसळून किरकोळ नुकसानीचे प्रकार घडले. ही घटना ताजी असतानाच नेमळे गावकर कुंभारवाडी येथेही आज पहाटे चिंचेचे झाड घरावर कोसळले. शेतकरी पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ याच्या मालकीचे हे घर असून यात त्याचे मोठे नुकसान झाले.घराच्या ज्या भागावर हे झाड कोसळले तेथील रुममध्ये घरातील कोणीच झोपले नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच नेमळे तलाठी पाटोळे, उपसरपंच सखाराम राऊळ, पोलीस पाटील रमेश नेमळेकर, सुनील राऊळ यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने घरावर पडलेले झाड हटविण्यात आले. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page