आधार कार्ड व्हेरिफिकेशन करा….

बांदा सहकारी सोसायटीकडून रेशन धारकांना आवाहन..

बांदा (प्रतिनिधी) : बांदा सहकारी सोसायटीच्या सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डमधील नमूद सर्व व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन त्याचे व्हेरिफिकेशन करणे शासनाने सक्तीचे केले आहे. अन्यथा रेशनकार्ड मधून सदर नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी रेशनकार्ड धारकांची राहील.

आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या. तसेच कुटुंबातील नमूद सर्व व्यक्तींचे अपडेट केलेल्या आधार कार्ड आणि शिधापत्रिका यांची छायांकित प्रत रेशन दुकानात ३० जून पर्यंत जमा करावी, असे आवाहन सोसायटी चेअरमन राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page