सावंतवाडी ता.२५-: आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिव्यांग मुलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले.
शहरातील शिरोडा नाका येथील जेष्ठ नागरिक सुविधा केंद्र येथे असलेल्या दिव्यांग मुलांसोबत केक कापून आमदार राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी दीनानाथ नाईक बास्तीव फर्नांडिस, अज्जू शेख आदी उपस्थित होते
