आपल्या पक्षाशी सत्ता गोव्यातील हॉटेलात विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठा सांगू नये…

पक्षातील महत्व कमी होईल म्हणून म्हापसेकर सैरभर,शैलेश दळवी यांची टिका

*💫दोडामार्ग दि.०१-:* आपल्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या पक्षाची निवडून आलेली नगरपंचायती वरील सत्ता गोव्यातील हाॅटेलमध्ये विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठेच्या गोष्टी सांगू नये. अशी जोरदार टीका करत , अनिषा दळवींना सभापतिपद मिळाल्याने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सैरभैर झाले असून, पक्षात आपले महत्व कमी होईल याची भीती त्यांना वाटत असल्यामुळेच ते वाटेल ते बडबडत असल्याचा टोला देखील दोडामार्ग येथील युवा कार्यकर्ते आणि अनिषा दळवी यांचे पती शैलेश दळवी यांनी लगावला आहे. अनिषा दळवी यांना सभापतिपद देण्यात आल्यामुळे आपण राजीनामा दिला, असा दावा श्री म्हापसेकर यांनी केला होता. या दाव्यानंतर श्री दळवी यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, पैशासाठी आपल्या पक्षाची निवडून आलेली नगरपंचायतची सत्ता विकणाऱ्यांनी पक्ष निष्ठा आणि स्वर्गीय अटलजींचा आदर्श यावर बोलू नये. २०१५ साली दोडामार्ग नगरपंचायतची निवडणूक भारतीय जनता पार्टीने जिंकली होती. दोडामार्ग शहराचा तसेच जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा पहिला नगराध्यक्ष विराजमान होणार होता.पण आपल्या पक्ष निष्ठेचा टेंभा मिरवणा-या म्हापसेकरांनी गद्दारी केली.कलंगुट-गोवा येथील हॉटेल मध्ये जाऊन पक्ष निष्ठा विकली. त्या वेळी त्यांना ना अटलजीं आठवले, ना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आठवले. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला पद मिळते म्हणून आणि तो कार्यकर्ता आपल्या पेक्षा मोठा होईल या असुयेपोटी विरोधी पक्षाबरोबर सेटिंग केली. दोडामार्ग पंचायत समिती सभापतीवर अविश्वास ठराव, बाळा नाईक सभापती बसू नये म्हणून केलेला विरोध अशी अनेक उदाहरणे आहेत. जेथे पक्षाला मागे खेचण्याचे काम याने केले आहे. डॉ दळवीना पद मिळाले यामुळे पक्षात आपले महत्त्व कमी होईल यामुळे सैरभैर होऊन ते वेड्या सारखे बडबडत आहेत. त्यामुळे आता परत ह्या माणसा बद्दल मी बोलणार नाही. नारायण राणे, नितेश राणेंनी दिलेली जबाबदारी पेलून आम्ही पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आणि दोडामार्ग तालुक्याच्या विकासास हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. असा विश्वास देखील त्यानी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page