मराठा समाजाला इ डब्ल्यू एस चे अर्ज देऊ नयेत असे आदेश देणाऱ्या तहसीलदारांची उचलबांगडी करा…

सीताराम गावडे:मनाई आदेश संपल्यानंतर तहसीलदार यांच्या विरोधात जन आंदोलन छेडण्यात येणार..

⚡सावंतवाडी ता.२०-:
मराठा समाजाला इ डब्ल्यू एस चे अर्ज देऊ नका असे आदेश देऊन मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक सोयी सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आर पार ची लढाई लढावी, लागेल.गोरगरीब मुलांवर अन्याय करणाऱ्या सावंतवाडी तहसीलदारांची खातेनिहाय चौकशी होऊन बदली होत नाही तोपर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सातारा पुणे,येथे ई डब्ल्यू एस दाखले दिले जातात,मात्र सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील हे शासन परिपत्रकाचा चूकीचा अर्थ लावून मराठा मुलांवर अन्याय करीत आहेत,एका समाजाला एखदा आरक्षण मिळाले की त्याने दुसऱ्या आरक्षणाचा लाभ घेऊ नये असे आहे,दुसरा दाखला देता येत नाही असा अर्थ होत नाही, आणि जर एखाद्या लाभार्थ्याने दोन ठिकाणी फायदा घेतला तर लाभार्थी शिक्षेस पात्र होतो,दाखला देणारा नाही,असे असताना सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी मराठा समाजाला इ डब्ल्यू एस दाखले मिळविण्यासाठी जो अर्ज उपलब्ध आहे तो देण्यात येऊ नये असे आदेश देऊन मराठा समाजाला शासकीय सोयी सवलती पासून वंचित ठेवले आहे.
ईसीबीसी बाबत महाविद्यालयात अध्यादेश आले नाहीत व तहसिलदार ई डब्ल्यू एस दाखले आरक्षण आहे म्हणून देत नाही याचा अर्थ मराठ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जात आहे,जो पर्यत मराठा शांत आहे तो पर्यंत ठीक आहे,मात्र सह्याद्री पट्ट्यातील मराठा मावळा पेटून उठला तर असे आदेश देणाऱ्या देणाऱ्या तहसीलदारांची उचल बांगडी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला आहे,व जिल्ह्यातील मनाई आदेश संपल्यानंतर तहसीलदार सावंतवाडी यांच्या विरोधात जन आंदोलन छेडण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page