सावंतवाडी तालुक्यात आज १६ रूग्ण सापडले..

सावंतवाडी-: सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन १६ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात भटवाडी येथे दोन तर संचयनी कॉम्प्लेक्स येथे एक रुग्ण सापडला आहे. तर न्हावेली, तळवडे, इन्सुली, सातार्डा, निरवडे, बावळाट, सांगेली, निरवडे सिल्वर अकर, या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर सावरवाड येथे तीन तर माजगाव येथे दोन रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ४९ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page