जुन्या पेन्शन योजनेला भाजपचा विरोध ; विद्यमान आमदार निरंजन डावखरे कधी दिसलेच नाहीत…

कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांची देवगड मध्ये पत्रकार परिषद..

⚡देवगड ता.१६:-: कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे गेल्या सहा महिन्यात कोठेही दिसलेच नाही. हे मला पदवीधर नोंदणी करताना प्रामुख्याने आढळले. शिक्षकांचा जुन्या पेन्शन योजनेला भाजपचा विरोध असून शिक्षकांना ती मिळावी यासाठी माझी आग्रही भूमिका असणार असल्याचे माहिती कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रमेश कीर यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जूनला होत आहे.कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे नुकतेच कोकण पदवीधर मतदारसंघाचा देवगड तालुक्याचा आढावा घेण्यासाठी देवगड येथे आले होते . यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत ,शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे, यावेळी उपस्थित होते.
यावेळी किर म्हणाले , आज मला कोकण पदवीधर मतदार संघाची व्याख्याच सांगावी लागते.
कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे गेल्या सहा महिन्यात कोठेही दिसलेच नाही. हे मला पदवीधर नोंदणी करताना प्रामुख्याने आढळले.ते मी येथे नमूद करतो कोकण पदवीधर मतदारसंघात या आमदारांचे प्राबल्याने काम असावं पदवीधरांचे प्रश्न पदवीधरांसाठी आपण काय करू शकतो याची एक नियोजनबद्ध आखणी असावी. कोकणातील सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर आपल्याला काय करता येईल. यासाठी स्थानिक प्रकल्प आहेत यामध्ये स्थानिकांचा सहभाग करून घेण्यासाठी आमदारकीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल.शिक्षकांचे प्रश्न शिक्षकांची जुनी पेन्शन योजना आहे. या पेन्शन योजनेला भाजपचा विरोध आहे ती शिक्षकांना मिळावी . यासाठी आपली आग्रही भूमिका असणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात निसर्ग आहे मात्र पर्यटनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा यांचा आजही अभाव जाणवत आहे. हा विकास झाला तर त्या माध्यमातून कोकणातील पदवीधरांना रोजगारांच्या अधिक संध्या उपलब्ध आहे , वेगवेगळ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून यूपीएससी एमपीएससी क्लासेस माध्यमातून चालवले जातात. तिथेही लक्ष देण्याची गरज आहे कारण कोकण विभागीय परीक्षा मंडळाकडे आपण पाहिलं तर आपल्याला अभिमानाने सांगावंस वाटतं गेली 13 वर्ष हे मंडळ सातत्याने कोकणात पहिला क्रमांक फटकावते. कोकणातील मुलांच्या विद्वत्तेबद्दल कोठेही दुमत नाही. मात्र दुर्दैवाने असं म्हणावं लागतं यूपीएससी एमपीएससी मध्ये हा प्रभाव तुलनेने कोकणातल्या मुलांचा कमी दिसतो. तिथे जाणीवपूर्वक प्रयत्न या पदवीधर आमदारांच्या माध्यमातून व्हावा असे आपणाला प्रामाणिकपणे वाटते. या सर्व मांडलेल्या मुद्द्यांसाठी काम करण्याची प्रामाणिक आपली इच्छा असल्याचे सांगितले. मला कोकण पदवीधर मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्याबद्दल मी पक्षाचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे नाना पाटोळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे विशेष आभार कीर यांनी मानले

You cannot copy content of this page