पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञान ग्रहण करावे-: वामन खोत…

⚡मालवण ता.१६-: आजच्या युगात पुस्तकाच्या माध्यमातून अधिकाधिक ज्ञान ग्रहण करणे ही काळाची गरज बनली असून पुस्तकाच्या वाचनामुळे माणूस ज्ञानसंपन्न बनल्याने पुस्तके ही त्याला आकाशाच्या उंचीवर घेऊन जातात एवढे महात्म्य या पुस्तकांमध्ये दडले असल्याने मुलांनी वाचनाचा छंद जोपासावा आणि स्वतःच्या जीवनाला आकार द्यावा असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण ) मुंबईचे मुख्यकार्यकारी अधिकारी तथा माजी मुख्याध्यापक श्री. वामन खोत यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नऱ्होना, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका चव्हाण आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी संस्थेचे मुख्य खोत यांनी पहिल्याच दिवशी एवढी विद्यार्थी संख्या पाहून आनंद झाला. त्याचप्रमाणे मुलांनाही आनंद झाला असेल कारण ज्याप्रमाणे त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच पहिल्याच दिवशी नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या पुस्तकांमुळे तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. ही पुस्तके वाचलात ज्ञान संपन्न होणार आहात असे सांगितले तर जॉन नऱ्होना यांनी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून तुमचे पर्यायाने या शाळेचे नाव उज्वल करा असे सांगितले.

शेवटी आर. डी. बनसोडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page