⚡मालवण ता.१६-: मालवण धुरीवाडा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे शिवसेना पक्षाचे चारकोप विधानसभा निरीक्षक अशोकभाऊ कासवकर तसेच नामदेव (भाई) कासवकर यांच्या वतीने एक संगणक संच भेट देण्यात आला. मालवण पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून कासवकर यांनी सामाजिक भावानेतून संगणक संच उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली ढोलम, शिक्षिका सौ. इल्साबेन फर्नांडिस, अंकिता धुरी, अश्विनी धुरी, कृषी अधिकारी संजय गोसावी, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा शिल्पा पराडकर, शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
फोटो :
मालवण धुरीवाडा प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी अशोक कासवकर, भाई कासवकर यांच्या वतीने संगणक संच भेट देण्यात आला.