सभापती डॉ अनिशा दळवी;दोडामार्ग प स मध्ये बोलताना केले आवाहन
*💫दोडामार्ग दि.३१ सुमित दळवी-:* जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरीकांनी सावधान राहणे गरजेचे असून यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या उपाययोजनांचे अमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी दोडामार्ग येथे केले. केरळ राज्याच्या धरतीवरती महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग जिल्हात रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी आज दोडामार्ग पंचायत समितीत आढावा बैठक घेत नागरीकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी उसप येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांचे अर्धवट असलेले काम पुर्ण करुन ते नागरिकांच्या सेवेस सज्ज करण्याचे निवेदन ग्रामस्थ पांडुरंग सोमा गवस यांनी दिले.सध्या हे आरोग्य उपकेंद्र धुळ खात पडले असुन लोकांचा पैसा वाया जात आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी असेही निवेदनात म्हटले आहे. तर सासोली येथील गायब झालेला रस्ता तसेच पाणीटंचाई यावरही आढावा बैठकीत चर्चा झाली. यावेळी डॉ.अनिषा दळवी यांसह दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रविण गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर,कोनाळ सरपंच पराशर सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
